सध्या म्युच्युअल फंड Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढलेला आहे. यामध्ये SIP अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन mutual fund systematic investment plan निवडण्याकडे नागरिकांचा कल जास्त आहे. SIP मध्ये गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज मिळते. यामुळे दोन फायदे होतात. एक म्हणजे चक्रवाढ व्याज असल्याने व व्याजदर जास्त असल्याने तुमची गुंतवणूक अनेक टक्क्याने वाढते. दुसरा फायदा म्हणजे यात एकाचवेळी जास्त रक्कम गुंतवण्याची गरज नसते. SIP द्वारे तुम्ही दरमहा ठराविक रक्कम म्युच्युअल फ़ंड मध्ये गुंतवू शकता.
उदाहरणच पाहायचे झाले तर तुम्ही दरमहा 2,500 रुपये 25 वर्षांसाठी गुंतवणूक mutual fund investment करत राहिले, किंवा 20 वर्षांसाठी 3,500 रुपये दरमहा किंवा 15 वर्षांसाठी 4,500 रुपये महिन्याला एसआयपी राहिले आणि तुम्हाला 12% वार्षिक व्याज यावर मिळाले तर त्यामुळे तुम्हाला किती फायदा होईल? म्हणजे तुम्ही केवळ 2500 , 3500 , 4500 गुंतवले तर किती फायदा होईल ते पाहुयात..
जर तुम्ही 25 वर्षांसाठी दरमहा 2,500 रुपये जर एसआयपीद्वारे गुंतवले तर एकूण रक्कम तुम्हाला मिळेल ती म्हणजे 47.44 लाख रुपये. यामध्ये तुमची मूळ गुंतवणूक असेल 7.5 लाख रुपये. यावर तुम्हाला व्याज मिळेल 39.94 लाख रुपये. आता समजा तुम्ही कालावधी कमी केला. म्हणजे तुम्ही 20 वर्षांसाठीच गुंतवणूक केली. परंतु महिन्याला तुम्ही 3,500 रुपये गुंतवले. असे केले तर तुम्हाला 20 वर्षांनी 34.97 लाख रुपये मिळतील. यामध्ये तुमची मूळ गुंतवणूक असते 8.4 लाख रुपये. त्यावर व्याज मिळते 26.57 लाख रुपये.
आता तुम्हाला कमी कालावधीसाठी अर्थात 15 वर्षांसाठी SIP करायची असेल तर तुम्ही मासिक त्यात 4,500 रुपये गुंतवत चला. असे केल्यास तुम्हाला एकूण 22.71 लाख रुपये मिळतील. यामध्ये तुमची मूळ गुंतवणूक असेल 8.1 लाख रुपये आणि व्याज असेल 14.61 लाख रुपये.
यातून तुम्हाला म्युच्युअल फंड्स मधील एसआयपी तुम्हाला कशी फायदेमंद ठरू शकते याचा अंदाज आलेला असेल.