पोहायला गेलेले पाच विद्यार्थी बुडाले, एकाचा मृत्यू, अहिल्यानगरमधील घटना

अहिल्यानगरमधून एक मोठी समोर आली आहे. पाटात पोहण्यासाठी गेलेल्या ५ विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात घडली आहे.

विनोद पुंड
1 Min Read

याबाबत अधिक माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी शाळा बुडवून पाटामध्ये पोहण्यासाठी गेले होते.

पाण्यामध्ये पोहत असतांना त्यातील दोघे पाण्यात बुडायला लागल्याने आरडा ओरडा करू लागले. त्यांचा आवाज ऐकून काही अंतरावर असलेले भानुदास रोडे, प्रशांत गावडे व अजय गावडे यांनी पाटाकडे धाव घेत पाण्यात उड्या मारून चार विद्यार्थ्यांना बाहेर काढले. परंतू एक विद्यार्थी पाण्यात खोलवर गेल्याने पाण्याची गती जास्त असल्याने संकेत श्रीपती तरटे या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजले आहे.

या घटनेमुळे विद्यापीठ परिसर सावित्रीबाई फुले विद्यालयात शोककळा पसरली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरटे या विद्यार्थ्याबरोबर पोहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्या विद्यार्थ्यांना पालकांच्या स्वाधिन करण्यात आल्याचेही सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी सांगितले आहे.

इयत्ता १० व १२ वी ची बोर्डाची परीक्षा तोंडावर आली असताना गेल्या दोन दिवसांपासून हे विद्यार्थी शाळेत गैरहजर राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

Share This Article
युवासत्ता ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ब्रेकिंग, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. मागील दहा वर्षांपासून विविध वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून कामकाजचा अनुभव