Ahilyanagar News : ई-पीक पाहणी केली का? अन्यथा पीकविम्यासाठी येईल अडचण, १५ जानेवारीपर्यंत मुदत

१ डिसेंबरपासून ई-पीक पाहणी सुरू झाली आहे. पीकविमा, हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्रीसाठी ई-पीकपाहणी आवश्यक असून, शेतकरी स्तरावरील नोंदणीस अवधा एक दिवस उरला आहे. आतापर्यंत केवळ १६ टक्के शेतकऱ्यांनी ई- पीकपाहणी केली आहे.

विनोद पुंड
1 Min Read

जामखेड तालुक्यात रब्बी हंगामातील १ लाख ६३ हजार ४५० गटांपैकी २६ हजार ४०० गटांची पीकपाहणी करण्यात आली आहे, तर १ लाख ३७ हजार ५० गटांची पीकपाहणी होणे बाकी आहे. नुकसानभरपाई मिळण्यासाठी बंधनकारक आहे.

ई-पीकपाहणी यंदाच्या रब्बी हंगामापासून ई- पीकपाहणी नोंदीसाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) मोबाइल अॅपच्या माध्यमातून शेतकरी व सहायक स्तरावरून पिकांची नोंद केली जाणार आहे. सध्या शेतकरी स्तरावरून ई- पीकपाहणी केली जात आहे. शेतकरी स्तरावरून नोंदणीसाठी १५ जानेवारीपर्यंतची मुदत आहे

यात शेतकऱ्यांना शेतात जाऊनच मोबाइल अॅपमध्ये पिकांचे फोटो अपलोड करून माहिती भरावी लागत आहे. ई-पीकपाहणी करताना शेतकऱ्यांना अडचण आल्यास मदतीसाठी सहायकांची नियुक्ती केली
आहे. शेतकरी स्तरावरील ई- पीकपाहणी कालावधी संपल्यानंतर उर्वरित खातेदारांची ई-पीकपाहणी कर्मचाऱ्यांमार्फत डीसीएस मोबाइलद्वारे त्यांच्या लॉगिनने पूर्ण करणार आहेत.

१६ जानेवारीपासून सहायक स्तरावरून नोंदणी..
शेतकरी स्तरावरील पीकपाहणी शेतकऱ्यांना १५ जानेवारीपर्यंत करता येणार आहे. त्यानंतर सहायक स्तरावरून १६ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ई-पीकपाहणीची नोंद घेतली जाणार आहे.

गाव नमुना १२ वर होईल नोंद

  • शेतकरी स्तरावरून नोंदवण्यात आलेल्या पीक नोंदीपैकी १०० टक्के पडताळणी सहायक स्तरावरून करण्यात येणार आहे. सहायक स्तरावरून नोंदविण्यात आलेल्या नोंदीची १०० टक्के पडताळणी ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत होणार आहे. त्यानंतर ई-पीकपाहणी गाव नमुना १२ वर प्रतिबिंबित करण्यात येईल.

Share This Article
५ वर्षांपासून डिजिटल माध्यमात कार्यरत, राजकीय लिखाणात हातखंडा

Home

Video

Money

Join

Place