नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात रविवारी (दि.१२) रात्री आठच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात वडील आणि त्यांच्या लहान मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुरेशनगर, हंडीनिमगाव येथील अनिल फिलीप दळवी (वय ४५) आणि त्यांचा १२ वर्षीय मुलगा प्रतीक हे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी झाले. अपघात इतका भीषण होता की पिता-पुत्राचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
अपघाताला कारणीभूत असलेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. आपल्या दुचाकीवरुन सुरेशनगरकडे जात असतांना दुचाकी (क्रमांक एम.एच.१७ बी.बी.४२७८) या मोटारसायकलला ट्रकने पुढच्या चाकाखाली धडक देवून थेट मागच्या चाकाखाली ही मोटारसायकल चिरडल्यामुळे या बाप लेकांचा या अपघातात जागीच मृत्यु होवून चेंदामेंदा झाल्याची दुर्देवी घटना घडली. या अपघाताची खबर मिळताच नेवासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिकांनीही यावेळी मदत कार्य केले.