दरम्यान मध्यंतरी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एका प्रकरणात अल्लू अर्जुनाच्या अडचणीत वाढ झाली होती. हैदराबाद मधील संध्या थिएटर मधील चेंगराचेंगरी प्रकरणात त्याला जेमध्येही जावे लागले होते. दरम्यान हैदराबादच्या नामपल्ली न्यायालयाने या प्रकरणी त्याचा नियमित जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, आता अल्लू अर्जुन हिंदी सिनेमात दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्याच कारण असं की, अलीकडेच अल्लू अर्जुनला मुंबईत पाहिले गेले होते.
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांची त्याने भेट घेतली होती. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसबाहेर दिसत आहे. साधारण ९ जानेवारी रोजी तो संजय लीला भन्साळी यांना भेटला असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता हिंदी सिनेमात अल्लू अर्जुन दिसेल असे म्हटले जात आहे. परंतु अद्याप अल्लू अर्जुन आणि भन्साळी यांच्यातील कोणत्याही प्रोजेक्टबद्दल खात्रीशील माहिती अद्यापतरी पुढे आलेली नाही.
परंतु या भेटीनंतर पण चाहत्यांनी मात्र अल्लुअर्जुन आता बॉलिवूडमध्ये दिसेल अशी चर्चा करायला सुरवात केली आहे.१८३० कोटींचा ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर, अल्लू अर्जुन आता बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालणार अशा चर्चा फॅन्स करताना दिसतायेत. एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार अल्लू अर्जुन अलीकडेच मुंबईत आला होता आणि त्याने संजय भन्साळींसोबत एका नवीन प्रोजेक्टबाबत त्यांची मिटिंग झाली असल्याचे यात म्हटले आहे.
पुढील प्रोजेक्टपूर्वी मोठा ब्रेक
सध्या अशी चर्चा आहे की, अल्लू अर्जुन त्याच्या पुढच्या चित्रपटावर काम करण्यापूर्वी एक मोठा ब्रेक घेणार आहे. त्यानंतर एका मोठ्या प्रोजेक्टवर अल्लुअर्जुन काम सुरु करतील. अल्लू अर्जुन सध्याच्या घडीचा मोठा सुपरस्टार आहे. तेलगू, हिंदी, मराठीसह अनेक भाषिक त्याचे फॅन्स आहेत. ‘पुष्पा २’ च्या प्रचंड यशानंतर अल्लू अर्जुनची फॅन फॉलोविंग प्रचंड वाढली आहे.
भन्साळींचे दोन प्रोजेक्टवर काम
संजय लीला भन्साळी हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत. सध्या ते दोन प्रोजेक्टवर काम करत आहेत. त्यापैकी पहिला रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट्ट यांचा ‘लव्ह अँड वॉर’. दुसरा प्रोजेक्ट आहे त्यांची गाजलेली वेब सिरीज ‘हीरामंडी’चा दुसरा सीझन. त्यांच्या दोन्ही प्रोजेक्टसची मोठी प्रतीक्षा चाहत्यांना आहे. ‘लव्ह अँड वॉर’ हा सिनेमा मार्च २०२६ मध्ये रिलीज होणार आहे.