Samsung Galaxy S25: स्मार्टफोन प्रेमींना या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगची मोठी प्रतीक्षा लागलेली आहे. येत्या 22 जानेवारीला होणाऱ्या Galaxy Unpacked प्रोग्राममधे ते लॉन्च केले जाणार आहेत. OneUI 7 आणि अत्याधुनिक मोबाइल हार्डवेअर असणारा हा स्मार्टफोन असेल.
आता या स्मार्टफोनची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी मोठी क्षुषखबर आहे. हा मोबाईल तुम्ही 2000 रुपये रिफंडेबल टोकन अमाउंट भरूनही बुक करू शकता. ही रक्कम तुम्हाला रिफंड मिळू शकते. परंतु आधीच जर तुम्ही 2000 रुपये भरून बुक केला तर त्याचे अनेक फायदे तुम्हाला मिळतील. चला तर मग त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
तुम्ही आताच 2000 रुपयांची रिफंडेबल टोकन अमाउंट भरली तर किमतीमध्ये 5000 रुपयांचा बेनिफिट्स तर तुम्हाला मुळेच पण सोबतच ग्राहकांना देशभरातील ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्सद्वारे ‘अर्ली सेल’ चा एक्सेस मिळेल.
सॅमसंगच्या वेबसाइटवरून जर तुम्ही या स्मार्टफोनची प्री-ऑर्डर बुक केलीत तर तुम्हाला लिमिटेड-एडिशन कलर निवडता येतील सोबतच विविध रॅम आणि स्टोरेज ऑप्शनही मिळतील. सोबतच सध्या तुम्ही वापरत असणाऱ्या स्मार्टफोनवर जबरदस्त एक्स्चेंज ऑफरही मिळतील.
Samsung Galaxy S24 5G AI Smartphone
(Marble Gray, 8GB, 128GB Storage)
Galaxy S25 Series मध्ये Galaxy S25, Galaxy S25 Plus और Galaxy S25 Ultra लॉन्च होतील असं म्हटलं जात आहे. परंतु सध्यातरी या स्मार्टफोनची फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स कंपनीने समोर आणलेली नाहीत. परंतु तुम्ही हे स्मार्टफोन 2000 रुपये भरून प्री-रिजर्व करू शकता. जर तुम्हाला हे स्मार्टफोन आवडले नाहीत तर तुम्हाला तुमची रक्कम पुन्हा परत मिळेल. त्यामुळे आता Samsung Galaxy S25 सीरिजचे चाहते लॉन्चिंगची प्रतीक्षा करत आहेत.